सुभाषित-पठन स्पर्धा

 सुभाषित अभियानाचे व सुभाषित पठन स्पर्धांचे स्वरूप

सुभाषित अभियान व सुभाषित पठन स्पर्धा इयत्ता २ री ते १० वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. सुभाषित पठन स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचे एकूण तीन गट केले आहेत-- 


● दुसरी ते चौथी--पहिला गट, 

● पाचवी ते सातवी--- दुसरा गट, 

● आठवी व दहावी — तिसरा गट. 


संस्कृत भारतीच्या कार्यकर्त्यांनी शाळांशी संपर्क साधून , मुख्याध्यापकांशी बोलून संस्कृतशिक्षकांना अभियानात सामिल होण्यास सांगावे. शाळेत संस्कृत विषय नसेल तरीही शिक्षक सहभागासाठी उत्सुक असल्यास त्यांना अभियानात सहभागी करून घ्यावे.त्यांना सुभाषितांसबंधी प्रशिक्षण दिले जाईल.जास्तीत जास्त शाळांशी संपर्क साधावा.


शिक्षकांसाठी/शाळांसाठी नोंदणी फॉर्मची लिंक १५ जूननंतर पाठवली जाईल. नोंदणी केल्यावर सहभागी शिक्षकांचे जिल्हावार व्हॉट्सैप ग्रुप केले जातील.शिक्षकांनी आपल्या सहभागी विद्यार्थ्यांच्या याद्या या ग्रुपवरील संस्कृतभारतीच्या प्रमुखाकडे पाठवायच्या आहेत. अभियानाचा खर्च पाहता गेल्या वर्षीपासून अभियानात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी १०/- रुपये शुल्क असेल. शाळेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे शुल्क एकत्र करून सहभागी शिक्षकांनी संस्कृतभारतीच्या दिलेल्या बॅंक खात्यामध्ये भरायचे आहे. 


शिक्षकांच्या ग्रुपवर सुभाषिते पाठवली जातील. त्यांच्या पठनाची तयारी सहभागी शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून करून घ्यावी.


सुभाषित-पठन-स्पर्धा १) शालेय स्तर २) जिल्हास्तर आणि ३) प्रांत स्तर अशा तीन स्तरांवर होणार आहेत. 


शालेय स्तरावर या स्पर्धांचे आयोजन सहभागी शिक्षकांनीच करायचे आहे. आपल्या शाळेतील ज्या गटांमधले विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी असतील त्या गटामधून प्रत्येकी तीन क्रमांक काढून त्यांची नावे आपल्या ग्रुपवर कळवावीत. 


शालेय स्तरावर संस्कृतभारतीकडून बक्षिसे दिली जाणार नाहीत. फक्त सहभागी असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल स्वरूपामध्ये एक सहभागाचे सर्टिफिकेट देण्याची व्यवस्था केली जाईल. शालेय स्तरावरील क्रमांक मिळवलेले विद्यार्थी जनपद (जिल्हा) स्तरावर स्पर्धेसाठी येतील.


जनपद स्तरावर स्पर्धेस पाठवलेल्या विद्यार्थ्यांमधून पुन्हा प्रत्येक गटातील तीन क्रमांक निवडले जातील. या विद्यार्थ्यांची प्रांत स्तरावर स्पर्धा होईल.


जनपद स्तरावर संस्कृतभारती कडून दिली जाणारी बक्षिसे पुढीलप्रमाणे असतील---


● प्रथम क्रमांक--- ५०१ रुपये

● द्वितीय क्रमांक--- ३५१ रुपये

● तृतीय क्रमांक--- २०१ रुपये


याखेरीज विजेत्यांना प्रशस्तिपत्र आणि सन्मानचिन्ह देखील दिले जाईल.


प्रांत स्तरावरील अंतिम स्पर्धेसाठी बक्षिसे पुढीलप्रमाणे आहेत---


● प्रथम क्रमांक १००१ रुपये

● द्वितीय क्रमांक ७५१ रुपये 

● तृतीय क्रमांक ५०१ रुपये


विजेत्यांना प्रशस्तिपत्र आणि सन्मानचिन्हही दिले जाईल.याखेरीज अभियानात सहभागी झालेल्या सर्व शाळांना आणि शिक्षकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्याची व्यवस्थाही संस्कृत भारती करेल.


गटानुसार पाठ करायच्या सुभाषितांची संख्या खालीलप्रमाणे असेल–


● पहिला गट (२ री, ३ री, ४ थी) --एकूण ३० सुभाषिते


● दुसरा गट (५ वी, ६ वी, ७ वी)--एकूण ५० सुभाषिते


● तिसरा गट (८ वी, ९वी, १० वी) -- एकूण ७० सुभाषिते


पहिल्या गटाला (२ री  ते ४ थी) फक्त सुभाषिते लयबद्ध आणि स्पष्ट उच्चारणासह म्हणणे अपेक्षित आहे. अर्थ सांगता येणे आवश्यक नाही.


दुसऱ्या गटाला (५ वी ते ७ वी) सुभाषिते म्हणणे आणि त्यांचा अर्थही सांगणे अपेक्षित.


तिसऱ्या गटाला (८ वी ते १० वी) सुभाषिते म्हणणे , त्यांचा अर्थ सांगणे आणि परीक्षकांनी विचारलेल्या एखाद्या सुभाषितावर स्वत:चे मत, विचार व्यक्त करणे अपेक्षित राहील.


समान गुण होत असल्यास 'अमुक अर्थाचे/विषयावरील कोणते सुभाषित आहे ते म्हण' अशा ऐनवेळच्या काही युक्तीने परीक्षक प्रश्न विचारू शकतात. तो परीक्षकांचा अधिकार असेल. 


(या सर्व नियमांमध्ये अत्यावश्यक असल्यास बदल करण्याचा अधिकार संस्कृत भारतीचा राहील)